धर्मं म्हणजे काय?
य:धारयति स धर्मं:.
मानवजातीने या जगात जगण्यासाठी कही धरणा स्वीकारल्या आहेत, उदा. परमेश्वर,ही एक अशी शक्ति आहे की जिचे अस्तित्व दिसत नहीं परन्तु त्याची जाणीव विविध मार्गांनी होते.परमेश्वर ही धरणा वेगवेगळ्या धर्मात वेगळी आहे.म्हणजेच विवध पद्धतीने तयार झालेल्या जीवन पद्धति म्हणजे धर्मं.आता या धर्माची विशिष्ठ तत्वे आहेत ज्याला अपण guidlines म्हणू शकतो.ही तत्वे आपल्याला त्या त्या संहितेतुन किंवा ग्रंथातून सापडू शकतात.ह्या तत्वांचे पालन रोजच्या व्यवहारात करणे,म्हणजे 'धर्माचरण'.धर्माचे संरक्षण अणि संवर्धन करणे म्हणजे धर्मातील प्रत्येक व्यक्तिने धर्माचरण करणे हाच होय !आपण बघतो की पाकिस्तानचे खेळाडू किंवा भारतीय संघातील एखादा मुस्लिम खेळाडू सामन्यादरम्यान पाणी पिताना खाली बसुनच पाणी पितो,जे इस्लाम ने सांगितले आहे.हे धर्माचरण.केवळ इस्लामी राष्ट्रातच नव्हे तर भारतातसुद्धा अपण अनेकदा ऐकले/पाहिले असेल की मुसलमान लोक त्यांची नमजाची वेळ झाली की ज्या ठिकाणी असतील तिथे नमाज पढतात मग तो रस्ता असो व रेलवे स्टेशन असो...अगदी धावत्या रेल्वेत पण... रस्त्यात नमाज पडून रहदारीला आड़थळा होणे निश्चितच योग्य नव्हे .परन्तु यातून त्यांची धर्माप्रति इश्वराप्राती आसलेली आस्था दिसून येते.अणि हेच कारण आहे की ज्या मुळे मुस्लिम समाजात प्रचंड एकी आहे. ख्रिस्चानांच्या बाबतीतहि असेच,त्यांच्या प्रार्थनास्थळी असणारी स्वछता,शांतता,शिस्त हे विचारत घेण्यासारखे आहे.भले त्यांच्यात कर्मकांड कमी असेल पण त्यांची त्यांचा इश्वारावरची भक्ति त्यांच्या कृतीतून दिसून येते.
No comments:
Post a Comment