Friday, 7 January 2011

हिन्दू धर्म अणि धर्माचरण

हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला हिन्दू धर्म म्हणजे ज्ञानाचे विश्व आहे.विद्येच्या अनेक उपासकांनी आपल्या ज्ञानाची यात भर घातली आहे.हिन्दू धर्माच्या ज्ञानकोषात काय नाही? आयुर्वेदापासून धनुर्वेदापर्यंत,’योगही तर हिन्दू धर्माने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे.हेच योगशास्त्र पाश्चात्यांनी त्यांच्याकडे नेले आणि आता अमेरिकेन योगाम्हणून आपल्याकडे मार्केटिंग करत आहेत. आणि इकडे योगविडनाचा प्रसार करणार्या रामदेवबाबांची खिल्ली विनोदी कार्यक्रमातून उडवली जाते. हिन्दू धर्मातील ज्ञान हे विज्ञानाधिष्ठित आहे हे आता सर्व जगाने मान्य केले आहे.त्यामुळेच की काय अमेरिकेतील सीनेट च्या कामकाजाची सुरवात स्वस्ति नो इन्द्रो वृध्धश्रवाया वेद्मंत्राने होते.पण आजचे हिन्दू मात्र हिन्दू धर्माचे आचरण करणे हे मागासले पाणाचे लक्षण मानु लागले आहेत.जे कही सण उत्सव साजरे केले जातात त्यात अनेक कुप्रथा शिरल्या गेल्या आहेत..उत्सवाच्या वेळी speaker वर बेताल दारू पिउन नाचणे हे तर सर्रास दिसते.गणेश उत्सवात मिरवणुकीसमोर "ऐ गणपत चल दारू ला .. " असली गाणी गणपतिसमोर लवली जातायत...असे असेल तर तो काय तुम्हाला बुद्धि देणार? स्त्री हे दुर्गेचे रूप असते आशा वेळी नवरात्रौस्तवात ' मुन्नी बदनाम हुई ..' अस म्हणून नाचणारे दुर्गेचा अपमानच करतायत ना? एकैकमक्षाराम पुसाम महापातक नाशनं' म्हणजे रामरक्षेतले एक अक्षर जरी उच्चारले तरी पापांचा नाश होतो अशी आमची रामरक्षा पूर्वी घराघरातल्या स्त्रीया म्हणत असत आणि त्यांची मुले ऐकून ऐकून ती शिकत असत आणि आत्मविश्वास, मानसिक ताकद वाढवत असत.आजकालच्या माता मात्र टीवीवरच्या षड्विकारानी भरलेल्या अणि मानसिक यातना देणार्‍या मालिका बघत बसतात आणि मुले इकडे मोबाइल,गेम्स नाहीतर इंटरनेट वर फाल्तुगिरी करत बसणार.कधी ते महापुरुषांची चरित्रे वाचणार? कधी ते विचार संपन्न बनणार?..आजकाल बालक मंदिरांच्या gathering मधे सुद्धा लहान लहान मुले 'शीला की जवानी...' वर नाचतात अणि त्यांचे पालक त्यांच्याकड़े कौतुकाने बघत बसणार असले तर त्यांच्यावर काय संस्कार करणार?या सर्व गोष्टीला पाश्चात्य संस्कृतिच आक्रमण अणि या अक्रमणाला प्रसारमाध्यमे जबाबदार आहेत.लोकांना Reality shows द्वारे मुर्ख बनवायच,अश्लीलता,हिंसाचार,कुसंस्कार त्यांच्यावर भिनवायाचे,त्यांची धर्मवारिल आस्था कमी करायची हाच प्रसर्मध्यामांचा उद्देश आहे .हिन्दू धर्म नष्ट करण्याच हे षडयंत्र आहे.आज समाजात व्यसनाधीनता ,अनैतिकता स्वैराचार वाधण्याच कारण धर्माचरण न करणे०००च आहे.आज पाश्चात्य लोकही हिन्दू धर्मातील लोकांचा अंगिकार करत आहेत.जूलिया रोबर्ट्स या अघाडीच्या अभिनेत्रिनेपण हिन्दू धर्मं स्वीकारला आहे हे त्याचेच एक प्रातीनिधिक उदाहरण आहे,अणि अपण मात्र आपल्या धर्माच्या इमारतीचा एक एक मजला धासलवत आहोत .31st valentyne day ,friendship day,mothers day इत्यादी आपण साजरा करत आहोत आपन आपला अप्ला वैचारिक बप्तिस्मा करून घेतला आहे.कोठेतरी हे थामबायला हवे.हिन्दूधर्मसंवर्धनासाठी लाधलेल्या योध्यांची क्रन्तिकराकांची ,न्यान महार्शिंचे स्मरण अपन करायला हवे .आपल्यातील ब्रह्मतेज क्षात्रतेज वधवायला हवे .अणि परम पवित्र हिन्दू संस्कृतीचा अभिमान बलगत शुद्ध धर्माचरण करायला हवे,तर अणि तरच हा हिन्दू धर्मं टिकेल .अणि एक दिवस जगच नियंत्रण करणारा हाच हिन्दू धर्मं असेल यात शंका नाही.
'

No comments:

Post a Comment